Home गडचिरोली लाडक्या बहिणींनी आमदार होळी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे

लाडक्या बहिणींनी आमदार होळी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे

40
0

आशाताई बच्छाव

1000805622.jpg

लाडक्या बहिणींनी आमदार होळी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे

जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे

गडचिरोली शहराचा लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा संपन्न

मेळाव्याला लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद लाडक्या बहिणींचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मानले आभार

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असून त्यांचे विधानसभेच्या विकासातील योगदान न विसरणारे आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे यांनी गडचिरोली येथील शहराच्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित लाडक्या बहिणींना केले.

यावेळी मंचावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे ,विधानसभेचे प्रमुख प्रमोद जी पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, ज्येष्ठ नेते प्रशांतजी भृगुवार, महिला आघाडीचे अध्यक्ष कविताताई उरकुडे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी , जिल्हा महामंत्री त्रिशाताई डोईजड , माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका लताताई लाटकर ,माजी नगरसेविका निमाताई उंदीरवाडे , तालुक्याच्या अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे पल्लवी बारापात्रे, अर्चना चन्नावार, पुनम हेमके, स्वाती चंदनखेडे , यांचे सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते

यावेळी बोलताना योगिताताई पिपरे म्हणाल्या की आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक मोठमोठी कामे खेचून आणली जिल्हा केंद्रावरील महिलांसाठी रुग्णालय असो व वैद्यकीय शासकीय रुग्णालय कोडगल गॅरेज यासारखे अनेक मोठमोठे प्रकल्प आणून कोंसरी व सुरजागड प्रकल्पातून स्थानिकांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी नेहमीच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले असून त्यांचे काम हे जनतेमध्ये दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी लाडक्या बहिणींनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी मागील १० वर्षात आपण केलेल्या कामाची माहिती दिली . लाडक्या बहिणींनी लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देवा भाऊ यांच्या पाठीशी राहून पुन्हा भाजपाला विजयी करावे असे आवाहन करीत मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्यावर स्नेह व्यक्त केले याबद्दल उपस्थित लाडक्या बहिणींचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चनाताई चन्नावार, संचालन पल्लवीताई बारापात्रे ,यांनी तर आभार प्रदर्शन वैष्णवीताई नैताम यांनी केले.

Previous articleब्रेकिंग ! सोयाबीन कापण्यासाठी गेलेल्या बापलेकांचा मृत्यू ! -घातापाताचा संशय !
Next articleपहेला येथे निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शत्रक्रिया शिबिराचे 5 ऑक्टोंबरला आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here