Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालय अंतर्गत स्वच्छता उपक्रम संपन्न…

सोनई महाविद्यालय अंतर्गत स्वच्छता उपक्रम संपन्न…

128

आशाताई बच्छाव

1000804167.jpg

सोनई महाविद्यालय अंतर्गत स्वच्छता उपक्रम संपन्न…  नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने आज दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी स.१०:३० वा. *स्वच्छता ही सेवा* या कार्यक्रमांतर्गत सोनई गावात विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम पार पाडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची स्वच्छता फेरी काढली. या स्वच्छता फेरीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही स्वच्छता फेरी ग्रामीण रुग्णालय सोनई येथे आली. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी विद्यार्थ्याना स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता केली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १२५ विद्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब खेडकर, प्रा. शरद औटी, प्रा. महेश ताके, प्रा. कावेरी ढोकणे, डॉ. विशाल फाटके, डॉ. तुकाराम जाधव, प्रा. विशाल पवार , प्रा. रूचिका लांडे त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleज्येष्ठांबाबत आपले संस्कार सोडाल तर मग कायदा आपले कर्तव्य बजावेल – दलजित कौर जज
Next articleवृद्धांना ओझे न समजता कर्तव्य म्हणून सांभाळा ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त –अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.