Home रायगड खासदार सुनिलजी तटकरे यांचे नागोठणे विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन

खासदार सुनिलजी तटकरे यांचे नागोठणे विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन

15
0

आशाताई बच्छाव

1000801733.jpg

खासदार सुनिलजी तटकरे यांचे नागोठणे विभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांची नुकतीच भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.
झी
लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी नुकतीच तटकरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. त्याबद्दल तटकरे यांचा सत्कार समारंभ सुतारवाडी येथे रवि. (दि.२९) रोजी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी खा. तटकरे यांचे नागोठणे विभागातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुतारवाडी येथे जाऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खा. तटकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी नागोठणे विभागातील रोहा पंचायत समितीचे माजी सभापती शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे विभाग भातगिरण सोसायटीचे विद्यमान सभापती सदानंद गायकर, ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर ठमके, नागोठणे भातगिरणीचे सदस्य चंद्रकांत गायकवाड, तानाजी लाड, पळस ग्रामपंचायतीच्या सरपंच निष्ठा विचारे, किसन बोरकर आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here