Home गडचिरोली १० वर्ष केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम आमदार डॉक्टर देवरावजी...

१० वर्ष केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम आमदार डॉक्टर देवरावजी होळी

32
0

आशाताई बच्छाव

1000790836.jpg

१० वर्ष केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आपल्या मागील १० वर्षाच्या कार्याचा लेखाजोगा करणाऱ्या “जिल्हा विकासातील भागीरथाचे वचनपूर्तीचे दशक”माहिती पत्रकाचे विमोचन

कोटगल बॅरेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी सुरजागड पोलाद कारखाना, नगरपंचायतिंची   निर्मिती, सह विविध कामे आपल्या प्रयत्नातून केल्याची दिली माहिती.

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझ्या जनतेने मला निवडून देऊन दहा वर्ष काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा आपण प्रयत्न केला केवळ विधानसभा क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेऊन काम केले. या १० वर्षाच्या कालावधीमध्ये आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील ५० वर्षात कधीच न झालेली कामे पूर्ण करण्याचा यथोचित प्रयत्न केला त्या कामांचा लेखाजोका मांडण्याचा प्रयत्न मी या  “जिल्हा विकासातील भागीरथाचे वचनपूर्तीचे दशक” या माहिती पत्रकातून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा भाजपा महामंत्री सौ योगिताताई  पिपरे ,तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटी शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा युवा मोर्चा महामंत्री मधुकरराव भांडेकर, शहराच्या अध्यक्ष कवीताताई उरकुडे, तालुक्याचे महामंत्री बंडू झाडे ,अनुसूचित जातीचे जनार्दनजी साखरे ,शहराचे महामंत्री विवेक बैस, तालुका महामंत्री देवानंद चलाख,  भाजप नेते यशवंत झरकर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार डॉ देवराव होळी म्हणाले की, कोटगल बॅरेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी सुरजागड पोलाद कारखाना, नगरपंचायतिंची   निर्मिती, जिल्हा स्टेडियम, महिला व बाल वाढीव रुग्णालय , हजारो कोटींच्या रस्त्यांची, पुलांची कामे,  तालुका क्रीडांगणे , बस स्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय , प्रशासकीय भवनांची निर्मिती , सह अनेक मोठी कामे आपण केलेली आहे. जिल्हा निर्मितीच्या इतिहासात कधी नवे एवढी कामे या १० वर्षाच्या कालावधीत झाली असल्याचा पुनरुचार त्यांनी याप्रसंगी केला

Previous articleविदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 19 वर्षाखालील राज्य संघात आदित्य तितीरमारे याची निवड।
Next articleपत्रकारितेच्या दुनियेतील “राजा” माणूस हरपला…! सच्चा सहकारी राजेंद्रकुमार राठोड सदैव स्मरणात राहतील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here