आशाताई बच्छाव
नेवासा विधानसभा निवडणुकीत गडाख विरुद्ध गडाख होणार संघर्ष . सोनई /कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी- विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नेवासा तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघताना दिसते आहे अचानकप बसणे मोठे बदल घडताना दिसत आहे आगामी होऊ घातलेल्या नेवासा विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात गडाख विरुद्ध गडाख संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज दिनांक 26 रोजी पानसवाडी येथे स्वर्गीय माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे बंधू किसनराव गडाख उर्फ पेशवे यांच्या अष्टभि चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख समर्थक एकत्र आले त्यावेळी किसनराव गडाख यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेची निवडणूक ही कुठल्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे स्पष्ट केले मात्र अद्याप पर्यंत ही जागा महाविकास आघाडीत नेवासाची ही जागा कुणाच्या वाट्याला जाते अद्याप गुलदस्त्यात ठेवल्याने या विधानसभेचे निवडणुकीच्या निमित्ताने ही जागा महा विकास आघाडीच्या कोणत्या पक्षाला जाते यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे मात्र काही झाले तरी विधानसभा निवडणुकीत लढवणारच असल्याचे किसनराव गडाख यांनी स्पष्ट केले आज किसनराव गडाख पाटील यांचा वाढदिवस असल्याने पानसवाडी त्यांच्या निवासस्थानी नेवासा तालुक्यामधील स्वर्गीय तुकाराम गडाख यांना मानणारे कार्यकर्ते एकत्र जमले होते यावेळी किसनराव गडाख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना आगामी विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढणारच असल्याचे स्पष्ट केल्याने नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा गडाख विरुद्ध गडाख संघर्ष होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत स्वर्गीय माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे नेवासा तालुक्यामध्ये स्वर्गीय तुकाराम गडाख यांना मानणारा मोठा कार्यकर्त्याचा संच आहे याआधी किसनराव पाटील गडाख उर्फ पेशवे यांच्याकडून कुठलेही राजकीय भाष्य करण्यात येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाअवस्था निर्माण झाली होती मात्र आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त किसनराव पाटील गडाख यांनी आगामी नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे मात्र अद्याप ते कोणाकडून निवडणूक लढवणार हे मात्र अद्याप पर्यंत गुलदस्त्यात आहे ही जागा कोणाच्या वाटेला जाते यावरच खरे चित्र अवलंबून असेल