Yuva maratha news
रोझेतील अकार्यक्षम ग्रामसेविका बदलीसाठी आमरण उपोषणाचा इशारा
(प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर)
मालेगाव:- नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रोझे ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांच्या तडकाफडकी बदलीच्या मागणीसाठी युवा मराठा महासंघाच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा संबंधितांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांची रोझे येथील कारकीर्द ही अकार्यक्षम ग्रामसेविका म्हणून चर्चचा विषय ठरली आहे.गावात कुठलेही विकासकामे नाहीत.गावी हजर न राहता वारंवार गैरहजर राहून आदिवासी महिला सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड यांचे फोन न उचलणे, सरपंच आदिवासी असल्याने त्यांना अपमानास्पद वागणूक देणे व सरपंचांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने अधूनमधून रोझे गावी आल्यावर कारभार करणे, स्वतः च्या हिटलरशाही पध्दतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नसताना किंवा कुणाच्या तक्रारी नसताना कामावरून बेकायदेशीररित्या कमी करणे आदी स्वरुपाची बेबंदशाही करून सुवर्णा सांळुखे यांनी आपल्या अकार्यक्षम कर्तबगारीचे दर्शन रोझेवासियांना करून दिल्याने अखेर कंटाळलेल्या सरपंच उपसरपंचानी गत काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले आहे.दरम्यान ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांची तडकाफडकी या गावातून बदली करण्यात यावी किंवा गाव बदलून देण्यात यावे अशी सर्वसाधारण मागणी सरपंच उपसरपंचानी केली आहे.तर प्रशासनातील अधिकारी याप्रश्नी बघ्याची भूमिका घेऊन मुग गिळून गप्प बसले आहेत.
अधिका-यांचे भगली बारा सारखे उलट सुलट उतरे
याप्रकरणी चौकशी करणारे विस्तार अधिकारी गुलाब राजबन्शी यांचेकडे आज (२६ ) रोजी रोझे उपसरपंच नामदेव मधुकर उगले यांनी चौकशी अहवालाची मागणी करताच राजबन्शी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन “मला तेवढेच काम आहे का?,बघू वेळ मिळाल्यावर अहवाल देईल! सध्या निवडणूकाचे काम आहे.मला बदली करायचे अधिकार आहेत का? तुम्ही ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे विरुद्ध पुरावे द्या, फक्त अर्जावर काय कार्यवाही करायची? ग्रामसेविका रोझे गावी हजर असते तुम्हीच खोटे अर्ज करतात अशा स्वरुपाची बेताल वक्तव्ये गुलाब राजबन्शी या विस्तार अधिका-याने करून आपल्या अकलेचे दिवे पाजळलेत.तर ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे या रोझे गावी नियमित हजर असतात तर त्यांचा दैनंदिन हजेरीपट कुठे आहे या उपसरपंच नामदेव मधुकर उगलेच्या प्रश्र्नांचे समर्पक उत्तर मात्र भगलीबारा विस्तार अधिकारी योग्य रितीने देऊ शकले नाहीत. “सुवर्णा सांळुखे वरील कार्यवाहीची टांगती तलवार कायम” व-हाणे ता. मालेगाव या गावी आपल्या कार्यकाळात ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांनी केलेल्या अकार्यक्षम महाप्रतापाची गाथा चौकशीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असून, त्याशिवाय टोकडे येथीलही प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहे.व-हाणे गावी सुवर्णा सांळुखे कार्यरत असताना त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या सगळ्याच बोगस कामाची पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी व व-हाणेतील आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या ताब्यात व वापरात असलेल्या शासकीय जागेच्या अंतीम निर्णयासाठी आणि १८ नोव्हेंबर २२ च्या युवा मराठा महासंघाच्या निवेदनानुसार व-हाणे गावातील झालेले सगळेच अतिक्रमण काढण्यासाठी, गावातील वाचनालयास दिलेल्या बेकायदेशीर जागेच्या सखोल चौकशीसाठी, तसेच सरपंच पदाचा वारंवार गैरवापर करणा-या सरपंचाच्या सखोल चौकशीसाठी हे आमरण उपोषण सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ पासून मालेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर छेडले जाणार असून,या उपोषण आंदोलनात राजेंद्र पाटील राऊत, रोझे सरपंच सौ.सुमनताई अभिमन्यू गायकवाड, उपसरपंच नामदेव मधुकर उगले, युवा मराठा महासंघाचे चांदवड तालुकाध्यक्ष सुनील गांगुर्डे आदी सहभागी होणार आहेत.






