Home नांदेड मुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ

मुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ

133

आशाताई बच्छाव

1000778115.jpg

मुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ

सात महीण्याचे मानधन रखडले

मुखेड युवा मराठा न्युज नेटवर्क बस्वराज वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मार्च २०२४ पासुनचे मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना त्यांच्या मानधनापासुन पासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी निवेदने व वरिष्ठ स्तरावर मागणी करून देखील आजपर्यंत त्यांचे मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी उपासमाराची वेळ आली असेच म्हणावे लागेल. तसेच त्यांचे रिनीवल देखील करण्यात आले नाही.संबंधित प्रशासणाचे याकडे सर्रास दुर्लक्ष झाले आहे.यामुळे सर्व कर्मचारी हे आक्रमक भूमिकेत दिसून येत आहेत. आपले मानधन मिळावे यासाठी आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी मुक्रमाबाद वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. नांदेड, तालुका आरोग्य अधिकारी, ता. आ. अ. कार्यालय, मुखेड,ट्रेझरी ऑफिस, नांदेड यांना दि.1आॕक्टोंबर पासुन काम बंद करण्याचे निवेदन देण्यात आले. आहे. यावेळी गजानन दनात्रय धुमाळे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
अमोल शिवाजीराव मोरे (औषधनिर्माण अधिकारी)समीर एम. सय्यद (वाहन चालक) राजू एम. वडजे (परिचर ) लतीफ ए. शेख – (परिचर)ज्योती डि. देवकांबळे (परिचर) यांची उपस्थित होती.

Previous articleमागास बहुजन कल्याण विभागा मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleमुक्रमाबाद येथे ग्रामस्वच्छता जनजागरण रॅली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.