Home अमरावती चिखलदरा तालुक्यात मेळघाटच्या घाट वळणाच्या रस्त्यावर बस चा भीषण अपघात .टायमिंगच्या नादात...

चिखलदरा तालुक्यात मेळघाटच्या घाट वळणाच्या रस्त्यावर बस चा भीषण अपघात .टायमिंगच्या नादात बस उसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जन जागीच ठार.

130

आशाताई बच्छाव

1000774550.jpg

चिखलदरा तालुक्यात मेळघाटच्या घाट वळणाच्या रस्त्यावर बस चा भीषण अपघात .टायमिंगच्या नादात बस उसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जन जागीच ठार.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सीमाडोह गावाजवळ नाल्यात ओव्हर स्पीड खाजगी ट्रॅव्हल बस उलटल्याने ६ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. त्यात शिक्षकांचा समावेश असल्याचे कळते आहे. अपघातात महिला शिक्षक सुद्धा जखमी झाल्या. मेळघाटातील विविध शाळांमध्ये कार्यरत हे शिक्षक सोमवारी सकाळी शाळेच्या वेळेवर हजर होण्यासाठी या खाजगी बस मधून प्रवास करीत होते. अमरावतीहून सकाळी सव्वा पाच वाजता निघणारी चावला कंपनीची ही बस अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचले. येथून पुढे ते धरणीच्या टायमिंग कव्हर करण्यासाठी मेळघाटच्या रस्त्यावर चालकांनी अतिशय वेगाने पुढे नेली. आठ आठच्या सुमारास ती बस गावाजवळील नाल्यात कोसळली. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहे. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले राजेंद्र पाल बाबू यांच्या सुद्धा मृत्यूमध्ये समावेश आहे. मृत देह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयास आणण्यात आले आहेत. जखमीवर धार्मिक तसेच परतवाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.