Home जळगाव चंदन तस्करीचा प्रयत्न-दोन तस्कर हाती लागले तर 7 जण फरार

चंदन तस्करीचा प्रयत्न-दोन तस्कर हाती लागले तर 7 जण फरार

39
0

आशाताई बच्छाव

1000760868.jpg

चंदन तस्करीचा प्रयत्न-दोन तस्कर हाती लागले तर 7 जण फरार

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील पाटणा जंगलात चंदन तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या गस्तीदरम्यान समोर आली. वन कर्मचार्‍यांनी ठिकठिकाणी या गँगचा दबा धरून पाठलाग केला असता त्यात दोन चंदन तस्कर हाती लागले तर 7 तस्कर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान घटनेतील फरार आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली असता कुर्‍हाडी,कोयता, सुरा तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लागणारे साहित्य मिळून आले.
या घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव(वन्यजीव)वनक्षेत्रातंर्गत पाटणा जंगल भागात वनरक्षक पाटणा व त्यांचे सहाय्यक रोजंदारी तत्वावरील वनरक्षक वनमजूर हे .शुक्रवार 13 रोजी मध्यरात्री गस्तीवर असतांना चंदन तोड होत असल्याची चाहूल या कर्मचार्‍यांना लागली. वन कर्मचार्‍यांनी ठिकठिकाणी दबा धरून पाठलाग केला असता तब्बल आठ चंदन तस्कर आढळून आले. वन कर्मचारी त्यांना पकडण्यास गेले असता त्यापैकी दोघे तस्कर हाती लागले. त्यांच्याकडे दोन कुर्‍हाडी, दोन करवत, पिशवीत स्वयंपाकाचे मसाले व 13 किलो ओला सालीसकट चंदन असा ऐवज मिळून आला. वन कर्मचार्‍यांनी या ऐवजासह तीन मोबाईल हॅन्डसेट ताब्यात घेतले.
पिंटू वाल्मीक गिरे (44) व शिवराम आबा मेंगाळ (36) दोन्ही रा. गुजरदरी ता. चाळीसगाव अशी अटक केलेल्या चंदन तस्करांची नावे असून त्यांना अटक करण्यात येवून पाटणा वनरक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी वनक्षेत्रपाल वन्यजीव एम.के. रहाटकर यांनी दोघा चंदन तस्करांना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची वन कोठडी सुनावली.
दोघा चंदन तस्करांची पोलीस रिमांड घेतल्यानंतर वन विभागाने त्यांची चौकशी केली त्यात इतर साथीदारांची नावे समोर आली. या फरार संशयित चंदन तस्करांची शोध मोहीम हाती घेतली असता लोढरे(ठाकरवाडी) ता.नांदगाव जि. नाशिक येथील मच्छिंद्र विठ्ठल पोकळे, भाऊराव लक्ष्मण मेंगाळ, सुकदेव गणपत आव्हाळे यांची समोर आली. त्यांचे सर्च वॉरंट घेण्यात येवून त्यातील सुकदेव गणपत आव्हाळे याच्या घराची झाडाझडती घेतली असता पथकास कुर्‍हाडी, सुरा, कोयता, पहार तसेच वन्यप्राणी शिकारीसाठी वापरात येणारे साहित्य नायलानचे जाळे आदी मिळून आले. सर्व साहित्य व हत्यार वन विभागाने जप्त केले.
त्यानंतर पथकाने आपला मोर्चा गुजरदरीकडे वळवला. तेथील फरार आरोपी धनराज आबा मंेंगाळ, शिवराम पिंटू गिरे, भाऊराव मच्छिंद्र मंेंगाळ, लखन कडूबा मेंगाळ सर्व रा. गुजरदरी यांचा शोध घेतला असता ते फरार असल्याचे समोर आले. वन विभागाच्या पथकाने अटकेतील आरोपी पिंटू वाल्मीक गिरे याची गुन्ह्याच्या कामी वापरलेली दुचाकी जप्त केली.
चंदन तोड प्रकरणातील फरार 7 आरोपींपैकी 3 आरोपी हे लोढरे(ढाकरवाडी ता.नांदगाव) व 4 आरोपी हे गुजरदरी(ता. चाळीसगाव) येथील असून या सर्वांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम खटला दाखल करण्यात आला आहे. तर अटकेतील दोघा आरोपींना 17 रोजी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव एम.के.रहाटकळ, पाटणा वनपाल गा.दे.चव्हाण, बोढरा वनपाल डी.के. जाधव, पाटणा वनरक्षक आर.जी. तडवी, विशेष वनरक्षक पी.सी. कुलकर्णी, ए.बी. मोरे, वनरक्षक तपासणी नाका पाटणा उमेश सोनवणे तसेच संरक्षण मजूर रमेश राठोड, राजाराम चव्हाण, गोरख राठोड, वाल्मीक, संदीप पवार, अशोक, सचिन जाधव, वाहन चालक बापू अगोणे यांनी केली. पुढील कार्यवाही विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) छत्रपती संभाजीनगरचे एम.बी. नाईकवडे, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव)कन्नडचे विशाल लोंढे, मानद वन्यजीव रक्षक चाळीसगाव राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) चाळीसगावचे एन.के. रहाटकर व कर्मचारी करीत आहेत.

Previous articleशेतमालकास तिघा चोरट्यांनी धमकी देत 19 बोकड व 7 बकर्‍या चोरून नेल्या
Next articleचाळीसगाव येथे एकदंत महोत्सवात गरीब कुटुंबातील मुलीला इलेक्ट्रिक स्कूटर मिळाली बक्षीस….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here