Home गडचिरोली खोट्या सह्यांची मोहीम राबवून भाजपाला  निवडणुकीत पराभूत करण्याचे षडयंत्र

खोट्या सह्यांची मोहीम राबवून भाजपाला  निवडणुकीत पराभूत करण्याचे षडयंत्र

115

आशाताई बच्छाव

1000760844.jpg

खोट्या सह्यांची मोहीम राबवून भाजपाला  निवडणुकीत पराभूत करण्याचे षडयंत्र

विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही अशाच खोट्या सह्यांच्या आधार घेवून पक्षाचा घात

गडचिरोली,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील माझे विरोधक मला विधानसभेची उमेदवारी मिळू नये याकरिता मोठ्या प्रमाणावर खोट्या सह्या दाखवून माझ्या विरोधात अपप्रचार करीत आहेत . लोकांकडून खोट्या सह्या करून घेत  वरिष्ठ पातळीवर माझ्या विरोधात षडयंत्र करीत आहेत . अशा सह्यांचा आधार घेऊन खोटे बोलून पक्षाची व जनतेची फसवणूक करीत  आहेत. त्यामुळे जनतेने अशा लोकांपासून सावध सावध राहावे व  सह्या करिता आपल्याकडे आल्यास त्यांस विरोध दर्शवावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

लोकसभा निवडणूक पूर्वी ही अशाच प्रकारे खोट्या सह्यांची मोहीम राबवून आपल्याच पक्षाची फसवणूक जिल्ह्यातील काही आपल्याच नेत्यांनी केली आहे.  त्याचा परिणामही आपल्याला लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. मूळ भाजपा विरोधी मानसिकता असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तशीच रणनीती तयार केली असून त्या माध्यमातून काँग्रेस व विरोधी पक्षाच्या लोकांना ताकद देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विचाराच्या लोकांनी अशा खोट्या व बेजबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आमिषाला भुलथापाना बळी न पडता तटस्थ उभे राहावे व त्यांचा कडाडून विरोध करावा असे आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती दया ; खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना
Next articleशेतमालकास तिघा चोरट्यांनी धमकी देत 19 बोकड व 7 बकर्‍या चोरून नेल्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.