Home उतर महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा महिला तालुका अध्यक्षपदी कु.अपर्णा सुभाष सोनार.

वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा महिला तालुका अध्यक्षपदी कु.अपर्णा सुभाष सोनार.

213

आशाताई बच्छाव

1000759765.jpg

वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा महिला तालुका अध्यक्षपदी कु.अपर्णा सुभाष सोनार.                सोनई , कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा महिला तालुकाध्यक्षपदी कु.अपर्णा सुभाष सोनार यांची एकमताने निवड .करण्यात आली. तशा निवडीचे पत्र निवड वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतेच देण्यात आले . कु.अपर्णा सुभाष सोनार यांची वारकरी साहित्य परिषदेची क्रेझ समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे,धार्मिक कार्यक्रमात ते सतत अग्रेसर राहतात,या कार्याची दखल घेत नेवासा तालुका महिला अध्यक्ष पदाची धुरा कु.अपर्णा सुभाष सोनार यांच्या खाद्यावर टाकण्यात आली आहे.तसेच संघटनेच्या माध्यमातून समाज प्रबोधन , गाव तेथे हरिपाठ, मंडळ स्वच्छतेचा जागर ,अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सतत राबवत आहेत.या निवडीचे वारकरी संप्रदाय मधील पदाधिकारी,विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.