Home जळगाव गणेशपूर येथील मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत..

गणेशपूर येथील मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत..

137

आशाताई बच्छाव

1000753431.jpg

गणेशपूर येथील मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत..

चाळीसगाव प्रतिनिधी  विजय पाटील- दि.१४ सप्टेंबर रोजी गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या.
आज दि.१६ सप्टेंबर रोजी मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शासनाच्या वतीने २५ लाखांची मदत मंजूर झाली असून त्यापैकी १० लाखांच्या मदतीचा धनादेश मोरे कुटुंबियांकडे सुपूर्द केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी, गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
स्व.रिंकेश च्या दुर्दैवी निधनामुळे मोरे कुटुंबियांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असले तरी शासन – प्रशासनातील दुवा या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleहिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा
Next article187 जिल्हा परिषद शाळांसाठी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेअंतर्गत 176 उमेदवारांना प्रशिक्षण आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.