*नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत आहे – नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजेश एन भांगे*
- नांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले ; एकाचा मृत्यू तर नांदेडच्या बिलोलीतही कोरोनाचा झाला शिरकाव असुन आजचीही बातमी नांदेडकरांसाठी धक्कादायकच ठलल्याचे दिसुन आले.
गुरुवार दि. २१ मे २०२० रोजी प्राप्त नमुन्यांच्या अहवालां पैकी ०६ नमुने Corona Positive अहवाल आलेले असुन.
☑️त्यापैकी २ रुग्ण प्रभाग क्र.15 लोहार गल्ली या भागातील असुन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका चा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे,
☑️०१ रुग्ण यात्री निवास, नांदेड येथे दाखल आहे ,
☑️ ०२ रावण कुळा , तालुका मुखेड, येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत.
☑️व ०१ केरुर, तालुका बिलोली येथील रहिवासी असून तो बीलोली येथील CCC मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
✔️नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.
☑️ आज दिवसभरात 6 पॉझिटिव रुग्णांची भर.
☑️ एकूण रुग्ण संख्या 116 वर.
☑️ 41 बरे होऊन घरी .
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️6 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️67 रुग्णांवर उपचार सुरू.
दरम्यान याबाबतची अधिकची माहिती दि. २२/०५/२०२० रोजी सकाळी देण्यात येईल व तसेच नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.