Home पश्चिम महाराष्ट्र सर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू!

सर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू!

306

⭕ सर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू! ⭕


कोल्हापूर 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवार-२२ पासून सर्व दुकाने, मार्केट सुरू होणार आहेत. यासह जिल्ह्यांतर्गत एस.टी. बससेवा, रिक्षा वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. सलून दुकानेही उद्यापासून खुली होणार असून त्याकरिता मात्र विशेष अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी रात्री जारी केले. सर्व शासकीय कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यातील बहुतांशी व्यवहार सुरळीत सुरू होतील. जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाने चौथा लॉकडाऊन जाहीर केला. यामध्ये झोन ठरविण्याचे तसेच झोनमध्ये केंद्र सरकारने निर्बंध कायम ठेवलेल्या सेवा वगळून अन्य कोणत्या सेवा सुरू करायच्या याबाबतचे अधिकार राज्य सरकारला दिले.
राज्य शासनाने सोमवारी (दि. १८) राज्यातील महापालिका क्षेत्र आणि जिल्हानिहाय रेड झोन, कंटेन्मेंट झोन आणि नॉन रेड झोन असे झोन जाहीर केले.

कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये करण्यात आला. झोननिहाय कोणते व्यवसाय, सेवा सुरू करता येतील याबाबत राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार जिल्ह्यात सर्व दुकाने, मार्केट खुली करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली. मात्र सर्व दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू राहणार आहेत. सर्वच दुकानांना परवानगी दिल्याने सम-विषमचा निर्णय आपोआपच रद्द झाला आहे.

रिक्षा सुरू होणार
लॉकडाऊनमुळे २५ मे पासून बंद असलेल्या रिक्षांचा या आदेशामुळे रस्त्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एका रिक्षात जास्तीत जास्त दोनच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. जिल्ह्यांतर्गत एस.टी. बससेवेला परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्यापासून जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सर्व भागात लाल परी धावणार आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्याकरिता प्रवाशांनी आणि कर्मचार्‍यांनी कोणत्या सूचनांचे पालन करायचे याबाबतच्या स्वतंत्र सूचना एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आल्या असून त्यानुसार प्रवासी वाहतूक करताना अंमलबजावणी केली जाणार आहे.

सलून (केशकर्तनालय) दुकानांनाही सशर्त परवानगी देत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. सलून, स्पा सेंटर सुरू करण्यास 13 अटी घालण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत. या आदेशानुसार अटींचे पालन करूनच हे व्यवसाय सुरू करावे लागणार आहेत. या अटींचे पालन झाले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. यासह सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, तंबाखू खाणे, पान खाण्यास आणि थुंकण्यासही मनाई करण्यात आली आहे.

Previous articleशिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरुन प्रवास! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित!
Next articleनांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.