Home जळगाव चाळीसगाव तालुक्यात अजून एक बालविवाह रोखला

चाळीसगाव तालुक्यात अजून एक बालविवाह रोखला

160

आशाताई बच्छाव

1000735906.jpg

चाळीसगाव तालुक्यात अजून एक बालविवाह रोखला

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव तालुक्यात बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले असून पोलीसांच्या सतर्कतेने आणखी एक बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे. अवघ्या 13 वर्षे 14 महिने वय असलेल्या बालिकेचा विवाह लावून देण्याचा प्र्रयत्न रोखण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात 9 सप्टेंबर रोजी 13 वर्षे 10 महिने वय असलेल्या बालिकेचे लग्न लावणार असल्याची माहिती मिळाली असता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहूल राजपूत व पोना. संदीप माने यांच्यासह तालुका समन्वयक पूनम जगदाळे एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेरचे श्रीराम राठोड, कविता पालवे यांनी या मुलीच्या कुटुंबियास पोलीस ठाण्यात बोलावून बालविवाहामुळे होणारे नुकसान याविषयी त्यांचे समुपदेशन केले.
तसे समजपत्र बालीकेच्या आई-वडिलांना देण्यात आले.
यापुर्वीही 24 ऑगस्ट रोजी असाच होणारा बालविवाह रोखला होता. कायद्याने बालविवाहावर बंदी असली तरी काही मात्र लोक बाल विवाह लावून देत आहेत.हे यानिमीत्ताने समोर आले. अल्प वयात मुला-मुलीचा होणारा विवाह रोखल्याने टीमचे कौतुक होत आहे.

Previous articleकोसगाव येथे अटल बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
Next articleस्थानिक गुन्हे शाखेचा टाकळी शिवारात हातभट्टीवर छापा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.