Home उतर महाराष्ट्र क . जे . सोमैया विद्यालयास आ . सत्यजीत तांबे यांची सदिच्छा...

क . जे . सोमैया विद्यालयास आ . सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट .

26
0

आशाताई बच्छाव

1000733478.jpg

क . जे . सोमैया विद्यालयास आ . सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट .
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी -हिंद सेवा मंडळाच्या क . जे . सोमैया हायस्कूलमध्ये नुकतीच नाशिक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांनी सदिच्छा भेट दिली . या प्रसंगी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, उपाध्यक्ष रविंद्र गुलाटी, सहसचिव रणजित श्रीगोड, विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे, जुनिअर विभाग चेअरमन विजय नगरकर, तेजस बोरावके प्राथमिक शिक्षक संघटनेचे सलीम पठाण ज्युनिअर कॉलेज संघटनेचे प्रतिनिधी श्रीरामपूर शहरातील शिक्षण प्रेमी विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघ आदि मान्यवर उपस्थित होते . विद्यालयाचे चेअरमन यांनी आ. सत्यजीत तांबे यांचे स्वागत व प्रास्तविक केले . हिंद सेवा मंडळाच्या . व विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमात आ . सत्यजीत तांबे यांनी विद्यालयाच्या बाल्कनी बांधकामासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले . विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानले . या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . सुत्रसंचलन रमेश धोंडकर यांनी केले . आभार अनिल चोभे यांना मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here