Home जळगाव बालविवाह होण्यापासून रोखला, तालुका समन्वयक पुनम जगदाळे व श्रीराम राठोड यांचे अभिनंदन

बालविवाह होण्यापासून रोखला, तालुका समन्वयक पुनम जगदाळे व श्रीराम राठोड यांचे अभिनंदन

111

आशाताई बच्छाव

1000722764.jpg

बालविवाह होण्यापासून रोखला, तालुका समन्वयक पुनम जगदाळे व श्रीराम राठोड यांचे अभिनंदन

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील-
बालविवाहावर
कायद्याने बंदी असली तरी काही लोक बालविवाह लावून देत आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील
एका गावात बालविवाह
होण्यापासून रोखला म्हणून
पुनम जगदाळे व श्रीराम
राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन
होत आहे.
याबाबत माहिती अशी चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दिनांक २४
ऑगस्ट २०२४ रोजी बालविवाह होत असल्याची गोपनीय
माहिती चाळीसगाव तालुका समन्वयक पुनम जगदाळे यांना मिळाल्यावर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण
पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक राहुल राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल
तुकाराम चव्हाण, श्रीराम
राठोड (एक्सेस टू जस्टिस
फॉर चिल्ड्रन, आधार
बहुउद्देशीय संस्था अमळनेर)
यांना सोबत घेवून त्या गावात विवाह ठिकाणी जावून
मुलगी व मुलाच्या परिवाराला चाळीसगाव ग्रामीण पोलीस
स्टेशन घेवून आले आणि आई-वडिलांना
समजपत्र देऊन व बालविवाहाचे होणारे नुकसान या संदर्भात समुपदेशन पुनम
जगदाळे व श्रीराम राठोड यांनी केले.
बालविवाह रोखणे ही काळाची गरज आहे मुलगी वयात आल्यावरच तिचे लग्न करा असे आवाहन पूनम जगदाळे यांनी केले आहे.

Previous articleग्रामीण भागापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण.
Next articleस्वर्गीय वाडीलाल भाऊ राठोड उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींचे कबड्डी स्पर्धेत यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.