आशाताई बच्छाव
नांदगाव विधानसभेसाठी राजेंद्र पाटील राऊत यांचा मोठा निर्णय..!
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणारे कौळाणे (नि) येथील रहिवासी राजेंद्र पाटील राऊत यांनी मतदार संघातील जनतेसाठी मोठा निर्णय घेतला असून, नांदगाव मतदार संघातील विविध समस्या सोडविण्यासाठी व लोकविकास हेच आपले ध्येय राहणार असून, मतदार संघातील सर्वसामान्य जनतेला सदैव चोवीस तास आपण वेळ देण्यासोबतच जनतेच्या विकासासाठी आणलेला निधी हा जनतेसाठीच खर्ची घालणार असल्याची ग्वाही राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.
नांदगाव मतदार संघातील सर्व जाती धर्माचे मतदार हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याने आपण या निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यास दरमहा जनता दरबार भरवून प्रत्येक गावातील नागरिकांना केलेल्या खर्चाचा लेखाजोखा सादर करणार आहोत.त्यासाठी आपण या निवडणूकी अगोदरच मतदार संघातील सर्वच मतदारांसाठी स्टँम्पपेपरवर एक शपथपत्र लिहून ठेवणार आहोत,त्यात आपला पुढील काळ हा फक्त मतदार संघातील जनतेसाठीच असणार असल्याचे शेवटी राजेंद्र पाटील राऊत यांनी सांगितले.