आशाताई बच्छाव
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे निधन
(भोकर ता.प्रतिनिधी पवन पाटील )
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलं नेतृत्व, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, जिल्हा बँक व इतरही पदे अनेक वर्षांपासून सांभाळत, राजकारणात नेहमीच सक्रिय असलेले नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, २०२४ नांदेड लोकसभेत ,जायंट किलर ठरलेले, इतरांशी बोलण्याची एक अलग शैली / ढब असलेले, नेहमीच आदरयुक्त व्यवहार, ते दीर्घ काळापासून आजारी होते. तेलंगणातील हैद्राबाद येथे उपचार सुरु होते पण शेवटी काळाचा महिमा काळच जाणे। शेवटी मृत्यू जिंकला याचे खूप दु:ख वाटते. शेवटी माणुस महत्वाचा माणुसकीच्या नात्याने वसंतराव चव्हाण पाटील यांच्या निधनाचे वृत अतिशय मनाला चटका लावून गेले; साहेब, आपणांस भावपुर्ण श्रध्दांजली