आशाताई बच्छाव
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे
साक्री छगन कोळेकर प्रतिनिधी
बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची मागणी करण्यात आली
बदलापूर कुळगाव आदर्श विद्यामंदीर येथील माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेच्या निषेधार्थ आणि अंसवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दि.२४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र *मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार* संविधानाचा आदर राखत महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला. मात्र पक्षाच्या वरील आदेशानुसार पिंपळनेर शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज रोजी पिंपळनेर नगरपरीषदेसमोर बदलापूर येथील माणूसकीला काळीमा फासणा-या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. प्राथमिक शाळेमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या.
जाहीर निषेध जाहीर निषेध