आशाताई बच्छाव
जायखेडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
चोरीच्या ३५ मोटरसायकली केल्यात जप्त दोन चोरट्यांना अटक !
(राजेंद्र पाटील राऊत)
जायखेडा दि.२३,:- जायखेडा पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर ३२३/२०२४ बिएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे १८ आँगस्ट २०२४ रोजी दाखल होताच जायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अनिकेत भारती अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, नितीन गणापूरे उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कर्मचाऱ्यांसह व गुप्त माहितीच्या आधारावर तपासास सुरुवात केली असता,चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच ४१ ए.व्ही. ५३४६ याबाबतीत माहिती काढून तपासादरम्यान आरोपी बादल भाऊदास पवार वय १९, शिवा छोटू पवार वय २६ दोन्ही रा. मुल्हेर ता.सटाणा जि.नाशिक,जयेश वाडीया माळवीस रा.झरी ता.बुशीर जि.डांग गुजरात यांना अटक केल्यानंतर पोलिस तपासात वरील आरोपींनी चोरीच्या एकूण ३५ मोटर सायकली काढून दिल्यात.या गुन्ह्यांच्या तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर पोलिस कर्मचारी व गुप्त माहितीच्या आधारावर या मोटर सायकल रँकेटचा छडा लावण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे.
ज्या वाहनधारकांच्या मोटरसायकली चोरीस गेलेल्या आहेत व त्याची तक्रार जायखेडा पोलिसांत नोंद असेल अशा वाहनधारकांनी जायखेडा पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी केले आहे.