Home उतर महाराष्ट्र सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे...

सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा – बाल कीर्तनकार कु.ईश्वरीताई जावळे.

171

आशाताई बच्छाव

1000670678.jpg

सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा – बाल कीर्तनकार कु.ईश्वरीताई जावळे.

कोपरगांव,(दिपक कदम प्रतिनिधी)..येथील
श्री क्षेत्र नगदवाडी गावी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहाच्या द्वितीय दिवशी बाल कीर्तनकार कु.ईश्वरीताई बाबासाहेब जावळे यांची सुश्राव्य किर्तन सेवा पार पडली.
सदर किर्तन सेवेमध्ये त्यांनी ‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचि देव होय गुरु’ या अभंगाचे प्रमाणबद्ध निरूपण केले. किर्तनप्रसंगी त्यांची देहबोली,हावभाव,आवाजातील चढ-उतार व सुस्वर गायन यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते. इतक्या लहान वयात तंतोतंत उदाहरणे व दाखले देऊन अप्रतिम असे किर्तन सादर केल्याबद्दल पंचक्रोशीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पिंगळा गायन हे या कीर्तनाचे मुख्य आकर्षण ठरले.त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना कुटुंबियांचे श्री.किशोर महाराज जावळे तसेच भागवताचार्य सौ.कविता साबळे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. नगदवाडी गावातील ग्रामस्थ,सप्ताह समिती,भजनी मंडळ या सर्वांचे ही विशेष सहकार्य लाभले.मनुष्य देह हा अनमोल आहे आणि याच जन्मात भगवंताचे कार्य करण्याचे सौभाग्य आपल्याला मिळते. तेव्हा सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करावे व सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे ते म्हणजे भगवंत सेवा असा संदेश त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिला.
ईश्वरी ताई जावळे या सोनेवाडी परिसरातील श्री.गंगाधर पोपट जावळे यांची नात असून त्यांना लहानपणापासूनच गायन व कीर्तनाची आवड आहे.शालेय शिक्षणाबरोबरच त्यांची ही आवड जोपासली जावी म्हणून कुटुंबीयांनी श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था सांगवी येथे त्यांचे नाव दाखल केले.या संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर महाराज घुमरे व सौ.कावेरी माई घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी ताई गेल्या एक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा अभ्यास करीत आहेत.

Previous articleबदलापूर अत्याचार प्रकरणी जालन्यात  महिला काॅंग्रेसचे मटका फोड आंदोलन
Next articleयुवा मराठा ब्रेकिंग न्यूज रविकांत तुपकरांना मुंबईतील मरीन ड्राईव्हवर अटक…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.