Home गडचिरोली तेली समाज बांधवांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय विकासाठी तेली समाजाचे एकत्रीकरण आवश्यक

तेली समाज बांधवांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय विकासाठी तेली समाजाचे एकत्रीकरण आवश्यक

38
0

आशाताई बच्छाव

1000668783.jpg

तेली समाज बांधवांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय विकासाठी तेली समाजाचे एकत्रीकरण आवश्यक

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे

चामोर्शी येथे तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार गडचिरोली यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-

तेली समाज बांधवांचा सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व राजकीय विकासासाठी तेली समाजाचे एकत्रीकरण आवश्यक आहे.तसेच तेली समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ तयार व्हावे याकरिता महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.
तेली समाज सभागृह,बाजार चौक,चामोर्शी येथे तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार,गडचिरोली यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा व गुणवंत विध्यार्थीचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.यावेळी उपस्थित तेली समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना इंजि.प्रमोदजी पिपरे बोलत होते.
याप्रसंगी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी,भिवापूर येथील बाल स्वामी पिपरे महाराज,जेष्ठ नेते बाबूरावजी कोहळे,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रानाजी सातपुते,तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर,साईनाथजी बुरांडे,शामराव दुधबळे, गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,दादाजी बारसागडे, नानाजी बुरांडे, गजाननजी भांडेकर,विलास नैताम,बंडुजी नैताम व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here