आशाताई बच्छाव
अमरावती शहरात बदलापूर घटनेचा प्रडसाद, शिवसेना (उभाठा)चे राजकमल, जस्टम चौकात आंदोलन.
दैनिक युवा मराठा
पी एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
बदलापूर येथील शाळेकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा शिवसेनेच्या वतीने त्रीव निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे देशात मुली व महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाल्याने या विरोधात जस्तंसह राजकुमार चौक येथे शिवसेना अमरावतीजिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हातात फलके दाखवत”आम्हाला सुरक्षा द्या”अशी मागणी करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलीच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला, तो धक्कादायक आणि संताप आणणार आहे. या निंदनीय घटनेच्या राज्यात सर्वत्र त्रि व निषेध होत असताना अमरावतीत देखील घटनेचे पडसाद उमटले आहेत. राजकमल चौक व जस्तम चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या घटनेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शासन विरोधात रोष व्यक्त करीत मुली व महिलांची सुरक्षा करण्याची मागणी देखील रेटण्यात आली. या आंदोलनात संपर्कप्रमुख सुधीर सुरवंशी, पराग गुडघे, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, सागर देशमुख, कांचन ठाकूर, प्रतिभा बोबशेट्टी, मनीषा टेंबरे, लक्ष्मी शर्मा, पियू शिका मोरे, राजश्री जटाले, जयश्री कुरेकर, श्याम धाने, स्वराज ठाकरे, विकास शेळके, शाली विधाते, नितीन तारेकर, पारस ढोके यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा राज्यात दिवसात दिवस महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे. यावरून राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.