Home गडचिरोली आरमोरी येथील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणीस मारहाण करणाऱ्या मुस्लिम युवक...

आरमोरी येथील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणीस मारहाण करणाऱ्या मुस्लिम युवक त्यांच्या पत्नीवर कठोर कारवाई करा:- भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे

100

आशाताई बच्छाव

1000665410.jpg

आरमोरी येथील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणीस मारहाण करणाऱ्या मुस्लिम युवक त्यांच्या पत्नीवर कठोर कारवाई करा:- भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे

भाजपा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा.पोलीस उप अधीक्षक एम. रमेश यांना दिले निवेदन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-

दि.१५ ऑगष्ठ स्वातंत्र्यदिनी आरमोरी शहरातील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.सदर पिडीतेवर अत्याचार होण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी.व आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी.याकरिता भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने मा.भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात निवेदन मा.पोलीस उपअधीक्षक एम.रमेश गडचिरोली यांना देण्यात आले.

गडचिरोली पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देतेवेळी भाजपा शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, जेष्ट कार्यकर्त्या प्रतिभाताई चौधरी,माजी नप सभापती वैष्णवी नैताम,महिला आघाडी तालुका अध्यक्ष अर्चनाताई बोरकुटे,शहर महामंत्री पल्लवी बारापात्रे,महामंत्री अर्चना चन्नावार,माजी नगरसेविका बेबीताई चीचघरे,माजी नगरसेविका लताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे,स्वाती चंदनखेडे,पुनम हेमके,निता बैस, अर्चना निंबोड,संगीता भडके,पुष्पा करकाडे व भाजपा गडचिरोली जिल्हा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.