Home नाशिक बागलाणची जागा काँग्रेसला सोडा,अन्यथा पराभवास सामोरे जा..!! आदिवासी काँग्रेस सेलचा महाविकास आघाडीस...

बागलाणची जागा काँग्रेसला सोडा,अन्यथा पराभवास सामोरे जा..!! आदिवासी काँग्रेस सेलचा महाविकास आघाडीस इशारा..*(

457
0

आशाताई बच्छाव

1000664708.jpg

बागलाणची जागा काँग्रेसला सोडा,अन्यथा पराभवास सामोरे जा..!! आदिवासी काँग्रेस सेलचा महाविकास आघाडीस इशारा..(नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे) नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व चांदवड-देवळा मतदारसंघाचे माजी आमदार मा.शिरीषभाऊ कोतवाल साहेब यांच्या चांदवड येथील तालुका काँग्रेसच्या कार्यालयात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.मिलिंद भाऊ चित्ते,जिल्हा परिषद सदस्य सौ.रेखा पवार यांचे पती व ताहाराबाद ग्रामपंचायत सदस्य यशवंत पवार,बागलाण तालुका आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण भील,उपाध्यक्ष विलास निकम,कोटबेलचे ग्रामपंचायत सदस्य दिपक माळी,टेंबे ग्रामपंचायत सदस्य वैभव मोरे यांच्यासह आदिवासी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन बागलाण मतदारसंघ हा आदिवासीबहुल मतदारसंघ असुन वर्षानुवर्ष येथे काँग्रेसचा पारंपारिक मतदार आदिवासी समाज हा राजकीय निराधार झाला आहे.कारण गेल्यावेळेस हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडल्यामुळे येथे त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.बागलाण हा सुरवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बागलाण तालुक्यातून आदिवासी समाजाने काँग्रेसला भरभरून मतदान करून खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना निवडून आणले.अशी परिस्थिती मतदारसंघात असतांना बागलाण मतदार संघ राष्ट्रवादीला सोडल्यास येथील काँग्रेसचा पारंपारिक मतदार आदिवासी समाज नाराज होईल व परिणामी येथे महाविकास आघाडीस पुन्हा पराभवास सामोरे जावे लागेल.अशी तक्रार आदिवासी सेलचे बागलाण तालुकाध्यक्ष प्रवीण भील यांच्यासह आदिवासी काँग्रेस सेलच्या शिष्टमंडळाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.शिरीषभाऊ कोतवाल यांच्याकडे केली.यावेळी आदिवासी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस दिपक गवळी, ताहाराबाद शहर उपाध्यक्ष एकनाथ सोनवणे,आकाश भील,वाडीपिसोळचे माजी सरपंच वसंत अहिरे,बिजोट्याचे उपसरपंच बापु माळी, किशोर अंकुशे सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायकवाड,योगेश माळी,यांच्या सहीचे पत्र देऊन केली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलाणची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात यावी व प्रवीण भील यांच्या पक्षीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रवीण भील यांना उमेदवारी देण्यात यावी अशा आशयाचे पत्र देऊन आजपर्यंत केलेल्या विविध कामांची फाईल कोतवाल साहेबांकडे सुपूर्द करण्यात आली.

Previous articleगरजूंना घरे बांधण्यासाठी शासकीय जागा द्यावी: राजवीर संघटनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा.
Next articleभाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांचा रक्षाबंधन कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here