आशाताई बच्छाव
जिल्हास्तरीय सायकलिंग
स्पर्धेत विठ्ठल जिल्ह्यात दुसरा
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड : जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत विठ्ठल नामदेव यलकटवार ह्याने १७ वर्ष वयोगटात जिल्हात दुसरा क्रमांक पटकाविला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. नांदेड येथे दि.०७ व ०८ ऑगस्ट २०२४ रोजी क्रिडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने असर्जन चौक विष्णुपुरी परिसरात पार पडलेल्या १० कि.मी.च्या स्पर्धेत मुखेडचा विठ्ठल नामदेव यलकटवार ह्या विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. हे अंतर त्याने १ तास,३ मिनिटं आणि ६ सेकंदात पूर्ण केले. परतीच्या प्रवासात रस्ता चुकल्याने, काही वेळ वाया गेल्याची खंत त्याने बोलताना व्यक्त केली.
या स्पर्धेची माहिती प्रशिक्षक विजय राठोड यांनी देऊन सरावासाठी मार्गदर्शन करून रजिस्ट्रेशन केले होते. विठ्ठल हा मुखेड येथील रहिवासी आहे. तर द ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल, उमरदरी येथे तो इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. तो शाळा सुटल्यावर आपला अभ्यास पूर्ण करूनही तो दहा किमी सायकलिंगचा सराव नेमाने करायचा. शिक्षण व सायकलिंग चा सराव ही तारेवरची कसरत करताना काही वेळा सराव चुकतोही पण माझी जिद्द आहे की सायकलिंग मध्ये राज्यात नाव मिळवायची हे यश माझ्या मार्गदर्शकांना जाते. त्यांच्याकडून मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यामुळे त्याची दखल घेऊन तहसीलदार राजेश जाधव यांनी विठ्ठलला बोलावून त्याचा सत्कार व कौतुकीची थाप दिली. यावेळी पेशकार मुधोळकर, प्रशिक्षक विजय राठोड, नामदेव यलकटवार उपस्थित होते.