Home नांदेड जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिशस्कूल उत्कृष्ट शाळा तर एकनाथ डुमणे सर उत्कृष्ट शिक्षक...

जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिशस्कूल उत्कृष्ट शाळा तर एकनाथ डुमणे सर उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

21
0

आशाताई बच्छाव

1000661304.jpg

जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिशस्कूल उत्कृष्ट शाळा तर एकनाथ डुमणे सर उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित रविवार १८ ऑगष्ट २०२४ रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा ता. महागांव जि. यवतमाळ येथे संपन्न झालेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघ राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार सोहळा – २०२४ या भव्य अशा कार्यक्रमात मुखेड येथील सुंदर निसर्गशाळा जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कुलला राज्यस्तरीय उत्कृष्ट शाळेचा पुरस्कार तर जि.प.प्रा.शाळा मंग्याळचे मुख्याध्यापक एकनाथ डुमणे सर यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार राजेंद्र नजरधने तर प्रमुख पाहुणे म्हणून माहूर दत्त संस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत साईनाथ महाराज , शाम महाराज भारती , पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे , युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट शाळेचे संचालक म्हणून ज्ञानोबा जोगदंड सर यांनी तर व उत्कृष्ट शिक्षक एकनाथ डुमणे सर यांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश जमदाडे सर यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी सत्कार मुर्तींना शाल श्रीफळ , पुष्पहार , स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे मान्यवर व्यक्तिमत्व व ग्रामीण पत्रकार बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष पांडे सर ,मुखेड तालुक्यातून पत्रकार तथा उपसंपादक तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुरेश जमदाडे , सचिव मनोज बिरादार , सहसचिव संग्राम पाटील तांदळीकर , ता. उपाध्यक्ष बस्वराज वंटगीरे सहसंघटक जनक गायकवाड , कोषाध्यक्ष श्रीनिवास पेंढारकर आदींची उपस्थिती होती.’या पुरस्काराबद्दल जिजाऊ ज्ञानमंदिर शाळेचे व उत्कृष्ट शिक्षक एकनाथ डुमणे सरांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleपिंपळे गुरव येथील वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची पिंपळे गुरव मधून धिंड काढण्यात आली
Next articleभाजपाने आ.डॉ .देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here