Home नांदेड श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती(लघु आळंदी) येथे श्रावण...

श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती(लघु आळंदी) येथे श्रावण महिन्यानिमित्त वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह. 

203

आशाताई बच्छाव

1000657778.jpg

श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती(लघु आळंदी) येथे श्रावण महिन्यानिमित्त वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड –श्रीक्षेत्र येवती (लघु आळंदी) येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री श्री परमपूज्य सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थांनच्या वतीने वार्षिक संजीवन समाधिकाल महोत्सवाचे  आयोजन शुक्रवार, दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले आहे.  त्यानिमित्य  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दि. 17 ऑगस्ट 2024 ते शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2024पर्यंत करण्यात आले आहे.  या सप्ताहात नित्य रोज समाधी रुद्र अभिषेक, नामजप, अनुष्ठान, गुरु चरित्र पारायण, नाराशाम स्तोत्र, गुरु महिमा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आदी होणार आहे.  पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, नराशाम स्तोत्र, गुरु महिमा, सकाळी १० ते  १२ गाथा भजन, सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरीकीर्तन व रात्री १२ ते ४ हरिजागर होणार आहे. या कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी ह.भ.प. धोंडिबा महाराज मोकासदरेकर, 18 ऑगस्ट ह.भ.प. गोविंद महाराज देशमुख, 19 ऑगस्ट ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज ईटग्याळकर ,20 ऑगस्ट ह.भ.प. नागोराव महाराज एकलारकर ,21 ऑगस्ट ह.भ.प. नरसिंग महाराज डोंगळीकर, 22 ऑगस्ट ह. भ. प मनोहर महाराज वसुरकर,23 ऑगस्ट ह. भ. प .शंकर महाराज खिसे इब्राहीमपूरकर, 24 ऑगस्ट  ह.भ.प. शंकर महाराज खिसे इब्राहीमपूरकर, यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दि 23 ऑगस्ट रोजी2024 श्री ज्ञानेश्वरी सांगता, सकाळी १० ते १२ गाथापूजा, दुपारी २ वा. संजीवन समाधी महाअभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री गंगाधर मारुती महाजन बाऱ्हाळी,श्री उत्तम दत्तात्रेय दाचावार सकनुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.  तसेच दि. 28 मे ते 08 जून या कालावधीत श्रीक्षेत्र रामेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी इच्छुक भक्तांनी लवकर संपर्क सद्गुरु सेवा समितीशी करावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमास परिसरातील नागरिक भक्तगनाणी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थांनचे मठाधिपती श्री प.पु सद्गुरु नराशाम महाराज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleपावसाबाबतची मोठी बातमी
Next articleपरळीत २१ ऑगस्ट पासून ०५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.