आशाताई बच्छाव
इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांचा चाळीसगाव येथे 24 तासांचा बंद
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- 9 ऑगस्ट रोजी कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांनी चाळीसगाव येथे 24 तासांचा बंद पुकारला असून वैद्यकीय सेवा
बंद ठेवली आहे. त्यामुळे चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) दि 17 सकाळी सहा पासून ते रविवारी 18 ऑगस्ट सकाळी सहापर्यंत बंद असणार आहेत. परिणामी शहरातील रुग्णसेवा विस्कळित झाली आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचे आयएमए’सह डॉक्टर संघटनांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान डॉक्टरांनी आज सकाळी मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी डॉक्टरांची भेट घेऊन आयएमएच्या संघटनेच्या मागण्या जाणून घेतल्या.संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील व पोलीस उपनिरीक्षक योगेश माली यांना निवेदन देण्यात आले.
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांसह महिला डॉक्टरावरील अत्याचाराच्या घटनांबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. स्त्री रोगतज्ञ डॉ. उज्वला देवरे यांनी सांगितले की, कुठल्याही क्षेत्रात मुली काम करत असतील तर त्या सुरक्षित राहील्या पाहीजे.घरी सुरक्षीत आली पाहीजे आणि कामाच्या ठिकाणीही सुरक्षितपणे आली पाहीजे. आरोपींवर कठोरक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ.सुनील राजपूत म्हणाले की,बहिणींना सुरक्षा नसेल तर देशाचे भविष्य कसे घडणार?कायदे केवळ कागदावरच असून डॉक्टरांना सुरक्षा दिली पाहीजे.
डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी आमदार मंगेश चव्हाण व माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भेटी देवून आपला पाठींबा दिला. आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की,कोलकात्यातील घटना ही अमानवीय असून वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना संरक्षण मिळालेच पाहीजे. आयएमएच्या संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारकडे पोहचवण्यासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्नशील राहील असे सांगितले.






