Home जळगाव पिंपरखेड येथील टकरखान बांधाऱ्यात बुडून 1 भाउ 3 बहिणींचा मृत्यू

पिंपरखेड येथील टकरखान बांधाऱ्यात बुडून 1 भाउ 3 बहिणींचा मृत्यू

200

आशाताई बच्छाव

1000655526.jpg

पिंपरखेड येथील
टकरखान बांधाऱ्यात बुडून 1 भाउ 3 बहिणींचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील पिंपरखेड येथील टकारखान बांधाऱ्यात बुडून 3 बहिणी व एका भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे उदय सुधाकर अहिरे यांचे शेतात कामाला असलेल्या सालदार सुभानिया देवचंद आर्य रा .सेंधवा, मध्य प्रदेश पावरा कुटुंबीय पोट भरण्यासाठी मजुरीकामासाठी आले होते. पती, पत्नी, 1 मुलगा, 4 मुली असा परिवार होता.
आज दि.18 रोजी सायंकाळी 5-45 वाजेच्या सुमारास पिंपरखेड ता. चाळीसगाव शिवारातील उदय सुधाकर आहिरे यांचे मालकीचे शेताला लागून असलेल्या टकारखान के टी. बंधाऱ्याचे पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेलेले असताना रोशनी सुभानिया आर्य 11, शिवांजली सुभानिया आर्य 9, आराध्या सुभानिया आर्य 4, व आर्यन सुभानिया आर्य 6, हे बंधाऱ्याचे खोल पाण्यात बुडून मयत झाले आहे.
ही घटना माहित पडताच गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले चाळीसगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी जाऊन त्या बालकांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणले.