Home महाराष्ट्र रेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार! २५ मे तारीख ठरवली.

रेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार! २५ मे तारीख ठरवली.

123
0
  • ⭕ रेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार!
    २५ मे तारीख ठरवली. ⭕
    ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

    भारतीय रेल्वेने १ जूनपासून मर्यादित प्रमाणात का होईना, पण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील विमान वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या २५ मे पासून म्हणजे अवघ्या ५ दिवसांमध्ये देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली आहे. ट्वीट करून त्यांनी हे जाहीर केलं आहे. ‘देशांतर्गत विमान वाहतूक येत्या सोमवारी २५ मे पासून सुरू होणार असून त्यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांना कळवण्यात आलं आहे. विमान वाहतुकीदरम्यान प्रवाशांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, यासंदर्भातले मार्गदर्शक नियम देखील जारी करण्यात येतील’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
    दरम्यान, किती विमानं सुरू होतील, किती प्रवाशांना परवानगी असेल, यासंदर्भात या ट्वीटमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.

Previous articleमुंबईत- एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर पुर्ण इमारतीऐवजी फक्त मजला सील होणार
Next articleबँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here