Home गडचिरोली ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हा

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हा

40
0

आशाताई बच्छाव

1000619675.jpg

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह आदिवासी संघटना व मित्र परिवाराचे आवाहन

९ ऑगस्ट सकाळी ७:३० वाजता इंदिरा गांधी चौकात मुले व मुलींसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार डॉक्टर देवराव होळी, आदिवासी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने गडचिरोली येथे सकाळी ७:३० वाजता खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इंदिरा गांधी चौकातून चंद्रपूर रोड मार्गावर आयोजीत करण्यात आली आहे. त्यामध्ये मुलांसाठी ५ किलोमीटर तर मुलींसाठी ३ किलोमीटर दौड चे आयोजन केले आहे . यामध्ये सहभागी मुलांना प्रथम पारितोषिक ७ हजार दुसरे ६ हजार तिसरे ५ हजार चौथे ४  हजार पाचवे ३ हजार  सहावे २ हजार तर मुलींना प्रथम पारितोषिक ५ हजार दुसरे ४ हजार तिसरे ३ हजार चौथे २ हजार पाचवे १ हजार  रूपये बक्षीस व सोबत एक शिल्ड देण्यात येणार आहे.

तरी या स्पर्धेमध्ये अधिकाधिक मुला-मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे , बादल मडावी ,कैलास गेडाम, भुषण मसराम, रुपेश सलामे,उमेश उईके यांचेसह विवीध आदिवासी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleआदिवासी समाजाने मानले ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
Next articleसापळी-सोंडा रस्त्याचे तीन तेरा बस सेवा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बससेवा सुरू करण्याची पालकांची आर्त हाक-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here