Home गडचिरोली प्रधानमंत्री आवास योजनेची न भेटलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा –...

प्रधानमंत्री आवास योजनेची न भेटलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा – डॉ. मिलिंद नरोटे

98

आशाताई बच्छाव

1000619561.jpg

प्रधानमंत्री आवास योजनेची न भेटलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा – डॉ. मिलिंद नरोटे

गडचिरोली ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

गडचिरोली तालुक्यातील मौजा मुरमाडी गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन सुद्धा लाभार्थ्यांना आत्ता पर्यंत फक्त एक- दोन हप्तेच मिळाले आहेत. काही लाभार्थ्यांनी बचत गटातून पैसे उचलले, कर्ज घेऊन घर बांधले आणि ते घर पूर्णत्वास आले. पण प्रशासनाकडून हप्ता न आल्यामुळे त्याचा परिणाम लाभार्थ्यांना ऐन शेतीच्या हंगामात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

त्याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेची उर्वरित रक्कम लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशी मागणी डॉ. मिलिंद रामजी नरोटे, उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी गडचिरोली तथा जिल्हा प्रभारी भाजपा आदिवासी मोर्चा गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे केली.

शिष्टमंडळामध्ये डॉ. मिलिंद नरोटे यांचेसह पंकज सोमनकार, सचिन भुसारी, लालाजी भुसारी, प्रवीण भोयर, रामदास भुसारी, दीपक कोहपरे, मुकुंदा भुयारी, किशोर भुयारी, हंसराज कोहपरे, प्रमोद भुयारी, केशव आवारी, अशोक डोईजड,लालाजी कोहपरे, तुळशीराम डोईजड, किशोर आवारी, रवींद्र आवारी, विकेश आवारी, मोरेश्वर आवारी, डोमजी भुयारी,सुधीर भुयारी, मुरलीधर आवारी, राजू भोयर आदी ग्रामस्थ उपस्थिती होते.

Previous articleदेगलूर महाविद्यालयात करियरकट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
Next articleकेंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवा:-इंजि.प्रमोदजी पिपरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.