आशाताई बच्छाव
जुनपाणी शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- जुनपाणी शिवारात आज सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी वन विभागासह पशुवैद्यकीय अधिकार्यांनी धाव घेत पंचनामा केला. मृत बिबट्याचे त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.
तालुक्यातील जुनपाणी शिवारात कम्पार्टमेंट 298 परिसरात आज सकाळी गुरे चारण्यास गेले असता त्यांना बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे अडीच ते तीन वर्षे वयाचा मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मेहूल राठोड, डॉ.ऋषिकेश मंत्री, पशुवैद्यकीय अधिकारी शीतल पवार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व सायंकाळी मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकार्यांनी मृत बिबट्याचे शव विच्छेदन केले असता बिबट्याच्या मानेवर जखमा आढळून आल्या.