Home नाशिक देवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी

देवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी

40
0

आशाताई बच्छाव

1000614463.jpg

देवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी

सतीश सावंत – प्रतिनिधी : देवळा

युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी उमेदवारी करावी, अशी आग्रही मागणी देवळा येथील युवा संवाद मेळाव्या प्रसंगी युवकांनी केली. देवळा येथील डॉ. दौलतराव आहेर सभागृहात शनिवार (दि.3) रोजी देवळा शहरातील युवकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा नेते केदा आहेर हे उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, अतुल पवार, विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज आहेर, चांदवड भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रशांत ठाकरे, किरण आहेर, उमेश आहेर, योगेश नानू आहेर, पवन अहिरराव, आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी तरुणांनी देवळा शहर व तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेळेवर बसेसची व्यवस्था, तसेच शहरातील आरोग्य विषयक सुविधा, शासकीय अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अडीअडचणी या विषयावर केदा आहेर यांच्याशी संवाद साधला.

त्यावेळी चर्चेतून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत केदा आहेर यांनी उमेदवारी करावी अशी आग्रही मागणी हजारो युवकांनी एकमुखी केल्याने केदा आहेर यांनी आपले मौन सोडत युवकांची खंबीर साथ माझ्या पाठीशी असेल तर युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण निश्चित आगामी विधानसभेची निवडणूक लढू अशी ठाम भूमिका युवा संवाद मेळाव्याप्रसंगी घेतली. यावेळी युवकांनी त्यांच्या या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Previous articleविधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट पडले, ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी १०० आमदार हवेत. प्रकाश आंबेडकर.
Next articleप्राचार्य प्रो.डॉ विलास आघाव यांना भारत शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here