Home नाशिक रघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी

रघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी

92
0

आशाताई बच्छाव

1000606223.jpg

रघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी

सतीश सावंत-प्रतिनिधी : सटाणा

सटाणा : राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, बागलाण विधानसभा मतदार संघ हा राखीव असल्याने येथे दिवसागणिक इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, यात एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी आपण बागलाण विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवार असल्याचे जाहीर केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी निसटता पराभव केला.

यानंतर या मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी संपूर्ण मतदारसंघात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, यात मूळचे बागलाण तालुक्यातील असलेले व देवळ्याचे माजी सरपंच तसेच एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघु नवरे यांनी देवळासह बागलाण तालुक्यात कार्यकर्त्यांची मोट बांधली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक उमेदवार आहेत.

दरम्यान, त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. नवरे हे देवळ्याचे माजी सरपंच असून, त्यांच्या सुविद्य पत्नी देखील देवळा नगरपंचातीच्या नगरसेविका होत्या. संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. गोरगरीब, सर्वसामान्य लोकांच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी नवरे यांनी आपले संबंध अबाधीत ठेवले आहेत. या माध्यमातून त्यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Previous articleलाडकी बहीण योजनेचा महिलांनी लाभ घ्या; विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – आ. आहेर
Next articleशहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here