आशाताई बच्छाव
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता आगामी निवणुकीच्या विजयाची तयारी करा
भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
गडचिरोली शहर व तालुका कार्यकारणी बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन गडचिरोली, (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये निवडणुकीत एकाचा विजय तर एकाचा पराभव होणारच मात्र झालेल्या पराभवाची कारणे जाणून घेत ती दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे व येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये एकजुटीने विजयासाठी काम करावे,नुकत्याच झालेल्या महायुतीच्या अर्थसंकल्पामध्ये महिला वर्ग,शेतकरी, युवा वर्ग,विध्यार्थीनी व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनजागृती करून पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून द्याव्या, असे आवाहन भाजपा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी गडचिरोली शहर व तालुका कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना केले.
यावेळी मंचावर माजी खासदार अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवरावजी होळी,ओबिसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.सौ.योगीताताई पिपरे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,डॉ. नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, डॉ.मिलींद नरोटे,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जेष्ठ नेते सुधाकर जी येंनगदलवार,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे जिल्हा उपाध्यक्ष अरूनजी हरडे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.