Home गडचिरोली चामोर्शी येथे मुल-आष्टी चौकात मा.सा कन्नमवार यांचा पुतळा उभारा

चामोर्शी येथे मुल-आष्टी चौकात मा.सा कन्नमवार यांचा पुतळा उभारा

26
0

आशाताई बच्छाव

1000559171.jpg

चामोर्शी येथे मुल-आष्टी चौकात मा.सा कन्नमवार यांचा पुतळा उभारा

महिला बेलदार समाज संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

३० जानेवारीपर्यंत पुतळा उभारणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे महिला बेलदार समाज संघटनेला आश्वासन

चामोर्शी/ गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा कन्नमवार यांचा चामोर्शी नगरपंचायत क्षेत्रातील मुल-आष्टी या चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी महिला बेलदार समाज संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली

याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मा.सा कन्नमवार यांचा पूर्णाकृती पुतळा ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकाना दिले.

यावेळी संघटनेच्या अध्यक्षा रजनीताई तन्नेरवार ,सचिव वैशालीताई कोमलवार, उषाध्यक्ष माधवीताई पेशट्टीवार, सदस्य विनाताई प्रीसिंगलवार , सोनी दाडमवार , हरबा प्रीसिंगलवार, साईनाथ पेशट्टीवार यांचे सह समाज भगिनी व बांधव उपस्थित होते.

Previous articleवंचितच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचे पती अरुण ठाकूर यांचे दुःखद निधन
Next articleलोकसभा निवडणुकीच्या पराभवाने खचून न जाता आगामी निवणुकीच्या विजयाची तयारी करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here