आशाताई बच्छाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोदमगाव येथील शाळेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला बालगोपाळ दिंडी सोहळा संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिराजदार
गोदमगांव ता.नायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने आषाढी एकादशी च्या निमित्ताने पूर्व संध्येला बालगोपाळ यांची दिंडी काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून फिरलेली वारकरी वेषभूषेतील ही दिंडी ग्रामस्थांचे आकर्षण ठरली…जि.प.शाळेचे मु.अ.श्री शहाजी सुनपे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या दिंडीत विठ्ठल रुक्मिणी रूपातील विद्यार्थी शिवाय पताका ,फुगडी,नृत्य ,टाळकरी विनेकरी हे गावाकऱ्यांचे मुख्य आकर्षण ठरले.हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मु.अ.श्री शहाजी सुनपे,जेष्ठ स शि. श्री बालाजी सोनमणकर ,श्री शरद पुरजवार ,श्री संतोष देवणीकर ,सौ.सपना शिंदे यांनी तसेच शाळा व्य.समिती अध्यक्ष श्री खोबाजी डोंगरे ,सदस्य श्री बाळू वडजे,श्री रावसाहेब शिंदे,श्री.भाऊराव शिंदे,नामदेव धोपटे यांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा पार पडला.