Home उतर महाराष्ट्र नेवाशात सर्वदूर पाऊस बळिराजा सुखावला; कपाशीला जीवदान

नेवाशात सर्वदूर पाऊस बळिराजा सुखावला; कपाशीला जीवदान

113

आशाताई बच्छाव

1000535373.jpg

नेवाशात सर्वदूर पाऊस

बळिराजा सुखावला; कपाशीला जीवदान

सोनई, (कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)-नेवासे तालुक्यात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कपाशी, सोयाबीन, तूर व इतर चारा पिकाला जीवदान मिळाल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. तालुक्यातील काही गावात वृक्ष व विजेचे खांब पडल्याने रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.
नेवासे खुर्द मंडलात सर्वाधिक पाऊस झाला तर घोडेगावला सर्वात कमी पाऊस झाला आहे. रात्री बारानंतर एक तास हलका तर काही वेळ मुसळधार पाऊस झाला. सोनई- पानसवाडी रस्त्यावर मोठे वृक्ष पडल्याने काही तास वाहतूक बंद होती. सोनई परिसरातील गणेशवाडी, हनुमानवाडी, लोहगाव, शिंगणापूर तसेच मुळाषडी भागातील खेडलेपरमानंद,
पानेगाव, करजगाव, अंमळनेर शिवारात समाधानकारक पाऊस झाला.
जून महिन्यात दोन तीन पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड व पेरण्या केल्या होत्या. पंधरा दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आल्याने अनेक
निभारी गोणेगाव रस्त्यावरील शेतात आज मंगळवारी दुपारी झालेल्या पावसाने शेतांना तळ्याचे स्वरूप आहे आहे.
भागातील कपाशी, सोयाबीन व तुरीचे पौक सुकून चालले होते. वातावरणात दमटपणा अधिक असल्याने पत्वसाची प्रतीक्षा होती. पाचेगाव, पुनतगाव, खूपटी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.
कुकाण्यासह परिसरात सोमवारी रात्री साडेअकरा वाजता दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास एक तास सुरू असलेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले.
जूनच्या सुरवातीला जोरदार झालेल्या पावसाने कुकाणे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली. पावसाअभावी खरीप हंगाम वाया जातीय की काय, असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकरी पावसाची बाट पाहत होते. प्रचंड उकाडा व कडक ऊन पाऊस नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने हातची पिके जाण्याची भीत होती. काही पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. सोमवार दिवसभर प्रचंड उपडल्यानंतर रात्री अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली एक तास झालेल्या पावसाने या सर्व पिकांना जीवदान मिळाले. काही ठिकाणी शेतांमध्येही पाणी साचले होते. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

मंडल व मिलिमीटर पाऊस
नेवासे खुर्द :
सलाबतपूर 26
सोनई: ४२
वडाळा: २६
• कुकाणे: २८
नेवासे बुद्दक: २७
घोडेगाव: २१

Previous articleशनिचौथऱ्याला घडीव दगडांचा साज अर्धा टप्पा पूर्ण; कलाकृती पाहण्यासाठी गर्दी
Next articleजिव्हाळा गृप च्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद कँन्सर ग्रस्त महिलेला दिली आर्थिक मदत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.