आशाताई बच्छाव
सुलभा खोडके यांचा तारंकीत प्रश्न; अमरावतीमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज निर्मिती पूर्वीच जागेवरून वाद.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्य शासनाने अमरावती शासकीय वैद्यकीय विद्यालयाच्या निर्मितीची घोषणा केली. त्यानुसार जागेची चाचपाणी करून समितीने बडनेरा जवळील कोंडेश्वर मार्गालगत वडद (आलियाबाद) या परिसरात”मेडिकल कॉलेज”निर्मितीवर शिक्कामोर्तब केले. मात्र ही जागा अतिशय लांब असून जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य वैद्यकीय सुविधाचा लाभ मिळणे कठीण होईल, भूमिका आमदार सुलभा खोडके यांनी घेतली आहे. जागेसंदर्भात पुन्हा एकदा बैठक बोलावून निर्णय घ्यावा अशी सूचना करत पर्यायी जागा देखील आ. खोडके यांनी सुचवली रवी राणा यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करा व बांधकामासाठी निधी मंजुरी बाबाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तर आ. यशोमती ठाकूर यांनी महाविद्यालयासाठी पूर्वी नांदगाव पेठ येथील जागा मंजूर झाली होती. परंतु काहींनी ती जागा वेळेवर बदलवली. त्यामुळे नांदगाव पेठ या पूर्वीच्या जागेवर मेडिकल कॉलेज स्थापन व्हावे. अशी भूमिका घेतली. पुन्हा बैठक घेऊन जागे संदर्भात निर्णय घ्यावा असे आ. सुलभाताई खोडके यांनी म्हटले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागे संदर्भात उपमुख्यमंत्री समितीने ठरविलेली जागा अमरावती शहरापासून १० किलोमीटर दूर असल्याने रुग्णांना तिथे जाणे दुरापास्त होणार आहे. मेळघाट-धारणी व गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे हेच महाविद्यालय स्थापन करण्याची उद्दिष्ट आहे. त्यामुळे जागे संदर्भात समितीने घेतलेला निर्णय बदलविण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका मांडून पुन्हा एकदा बैठक घेऊन जागे संदर्भात निर्णय घ्यावा, असा का
तारंकीत प्रश्न आ. सुलभाताई खोडके यांनी गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. हे कॉलेज नांदगाव पेठ येथे व्हावे अशी ऑड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूर्वी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील जागा मंजूर झाली होती. परंतु काही भूमाफियांच्या जमिनीचे भाव वाढविण्यासाठी राजकीय स्वार्थी जागा वेळेवर बदलविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागी संदर्भात उपमुख्यमंत्री समितीने जो निर्णय घेतला, ती जागा अमरावती शहरापासून १० किलोमीटर दूर असल्याने रुग्णांना तिथे जाणे अवघड होणार आहे. कोट्यावधी रुपयाचा खर्च व्यर्थ जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उपयुक्तता जिल्ह्याकरिता होणार नाही
त्यामुळे जागेसंदर्भात समितीने घेतलेला निर्णय बदलविण्यात यावा, अशी आमची आग्रही विनंती मागणी आमदार ऑड. यशोमती ठाकूर यांनि शासनाकडे केली आहे. यावर्षीपासून मेडिकल कॉलेज सुरू व्हावे: अशी अशी भूमिका आमदार रवी राणा यांनी घेतली. क्षणिक वर्ष २०२४ पासून अमरावती शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करा अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांना बुधवारी पत्राद्वारे केली आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाला १३०० कोटी पैकी पुरी समिती मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे
शासकीय मेडिकल कॉलेज बाबत सभागृहात लक्षवेधी सादर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर मार्गलागत हे मेडिकल कॉलेज निर्माण होत असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री याबाबत काय म्हणाले?”शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समितीने निवडलेल्या जागे संदर्भात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. ती जागा समितीने नेमलेली असल्याने आता जाईल, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेऊ”असे हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी म्हटले आहे.






