Home नाशिक नाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही

नाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही

63
0

आशाताई बच्छाव

1000522271.jpg

नाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही
सतीश सावंत : विभागीय प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस चोरी, गाड्यांची तोडफोड आणि खुनाच्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच आता नाशिकमधून आणखी एक हादरवणारी घटना समोर आली असून, नाशिक शहरातील गंजमाळ परिसरातील पंचशीलनगर येथे घरात घुसून एका १८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील गंजमाळ परिसरातील पंचशील नगर येथे १८ वर्षीय पांडू शिंगाडे या तरुणाची त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली आणि विशेष म्हणजे यावेळी त्याचा भाऊ त्याच्या शेजारी झोपलेला होता आणि हे त्यालाही कळाले नाही. भरवस्तीत ही घटना घडली असून, यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे. या तरुणाच्या हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हत्या करून हल्लेखोर फरार झाले असून, या प्रकरणी अज्ञातांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here