आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम द्या
आमदार शंकरराव गडाख ; .अन्यथा आंदोलन छेडणार
सोनई, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी
वर्षीच्या खरीप हंगामातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा भरपाई मिळाली नाही. रब्बी हंगामात अद्याप एकाही शेतकऱ्याला भरपाई मिळाली नसल्याने राज्य सरकारने विमा कंपन्यांना तातडीने रक्कम देण्याची सूचना करावी, अशी मागणी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रलंबित प्रश्नांवर आपल्याला नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील एकूण
62 हजार 228
शेतकऱ्यांनी ४५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा हप्ता भरला केंद्र, राज्य व शेतकऱ्यांनी मिळून ३४ कोर्टीचा विमा हप्ता विमा कंपन्यांना भरला होता. खरिपाच्या कालावधीत २१ दिवस पावसाचा खंड झाल्याच्या निकषात तालुका बसल्याने विमा भरपाईपोटी १३ हजार शेतकऱ्यांना अवधी २५ टक्के अग्रीम रक्कम मिळाली होती. त्यातील ८० टक्के शेतकरी वंचित राहिलेले आहेत.
शंकरराव गडाख होता. तालुक्यात
खरीप हंगामाच्या शेवटी झालेल्या
एक लाख विमा दावे प्रलंबित
शासनाने मोठा गाजावाजा करून एक रुपयात पीकविमा योजना आणली. त्यात सहभाग घेऊन विमा भरला खरा. मात्र, निसगनि पिकांचे नुकसान होऊनही शेतकरी विमा भेटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात ५२ हजार शेतकऱ्यांनी ३४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी शासन व शेतकऱ्यांनी १५ कोटी ५१ लाखांचा हप्ता भरला असताना कुठलीच भरपाई मिळाली नाही. खरीप व रब्बी हंगाम मिळून विमा भरपाईचे जवळपास १ लाख विमा दावे प्रलंबित आहेत. हा गंभीर प्रश्न विचारत घेतला नाही, तर लवकरच शेतकऱ्यांसह आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार गडाख यांनी दिला आहे.
अवकाळी पावसात तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या निकषातही तालुका बसला. मात्र, त्यापोटी अवघे ११ कोटी ७५ लाख रुपये रक्कम मंजूर झाली असून, त्यातील
लाभधारकांना सध्या वितरण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नसल्याचे आमदार गडाख यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.






