Home जळगाव पावसाळा सुरू होण्याआधी गजबजला बैल बाजार

पावसाळा सुरू होण्याआधी गजबजला बैल बाजार

169

आशाताई बच्छाव

1000411167.jpg

पावसाळा सुरू होण्याआधी गजबजला बैल बाजार

चोपडा प्रतिनिधी: सुरेंद्र बाविस्कर

बळीराजा आणि सर्जा राजा यांच्यातील जीवाभावाचं नातं चोपडा तालुक्यातील बैल बाजारात बघायला भेटले, कारण
एखादा कर्जबाजारी शेतकरी डोळ्यात पाणी भरून आपली बैल जोडी विकत आहे तर दुसरा शेतकरी सावकाराकडून कर्ज काढून मशागतीसाठी बैल जोडी विकत घेत आहे.

आज 26 मे पावसाळा आता तोंडाशी आला आहे शेती पेरणीसाठी तयार करण्याचे कामे कामे जवळजवळ आता उरकण्यात आली आहे एकदा पाऊस चालू झाला की शेतकरी पुन्हा आपल्या सर्जा राजाला घेऊन पेरणीसाठी सज्ज राहण्यासाठी चोपडा बैल बाजार गाठत आहे ऊन जास्त असल्यामुळे पहाटे सहा वाजेपासूनच चोपडा बैल बाजार मध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली
सुंदर अशा बैल जोड्यां एक लाख दीड लाख किमतीच्या भावात देवाणघेवाण होताना पहावयास मिळाले,

सर्वीकडे उष्णताची लाट चालू असल्यामुळे बाजार समितीने बैल बाजारात शेतकऱ्यांसाठी मंडपाची ही सोय केली आहे आणि पाणी पिण्यासाठी थंड पाण्याची सोय देखील आहे त्याबद्दल शेतकऱ्यांकडून बाजार समितीचे आभारही मांडण्यात आले

माझ्या बळीराजाला निसर्गाची साथ आणि हमीभावाची साथ मिळू दे जेणेकरून जगाचा पोशिंदा दोन वेळेस पोटभर जेवण करेल.

Previous articleवारजे आयडॅाल २०२४ गायन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ..
Next articleशहरातील मान्सूनपुर्व कामांकडे वाशिम नगर परिषदेचे दुर्लक्ष – श्रीमती करुणाताई कल्ले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.