आशाताई बच्छाव
दहावीत अमरावती विभागातून ९५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: अमरावती विभागात वाशिम पहिला स्थानावर अमरावती त सर्वात मागे.
__________
दैनिक युवा मराठा
पी.एन .देशमुख.
अमरावती
जिल्हा विभागीय संपादक..
अमरावती.
दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागातील ९५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या कमी असल्याने त्या जिल्ह्याने ९६.३६ टक्क्यासह विभागात पहिला क्रमांक प्राप्त केला. त्याचवेळी अमरावती जिल्ह्यात मागे राहिला. या जिल्ह्याचा निकाल ९४.०९ आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार १५२ विद्यार्थिनी एस एस सी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ६२ हजार ७३४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी १ लाख ५४ हजार ७२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ३९ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३८ हजार १२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उतरणेतेची टक्केवारी ९५.३६ एवढी आहे. यवतमाळ जिल्ह्यातून ३८ हजार २१३ विद्यार्थी ही परीक्षा दिली. त्यापैकी ३६ हजार १३९(९४.५७) टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अमरावती जिल्ह्यातील ३८ हजार ९६३ विद्यार्थी एसएससी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३६ हजार ६६२(९४.०९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याचवेळी वाशिम जिल्ह्यातले२० हजार६६ परीक्षार्थी पैकी१९ हजार९३७(९६.३६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण होऊन अमरावती विभागातून पहिला क्रमांक ठरलेला आहे. प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. जिल्हा न्याय निकाल खालील प्रमाणे, जिल्हा वाशिम टक्केवारी ९६.३६, स्थान प्रथम, जिल्हा अकोला ९५.८६, स्थान द्वितीय, जिल्हा बुलढाणा ९५३६, स्थान तृतीय, जिल्हा अमरावती ९४.०९, स्थान पाचव्या क्रमांकावर गेलेले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज सोमवार, २७ मे रोजी दहावीच्या निकालाची घोषणा केली. यामध्ये ९५.०७ टक्क्याचा अमरावती विभाग राज्यात पाचव्या स्थानावर आहे. विशेष असे की अमरावती विभागातून अमरावती जिल्हा ही पाच्या स्थानात आहे दरम्यान राज्यात एकत्रित निकाल९५.८१ टक्के निकाल आहे.






