Home नांदेड आदित्य पंढरीनाथ रणवीरकरने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.40% टक्केवारी घेऊन मिळवले यश.

आदित्य पंढरीनाथ रणवीरकरने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.40% टक्केवारी घेऊन मिळवले यश.

73
0

आशाताई बच्छाव

1000410860.jpg

आदित्य पंढरीनाथ रणवीरकरने दहावी बोर्डाच्या परीक्षेत 98.40% टक्केवारी घेऊन मिळवले यश.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड देगलूर -20 वर्षानंतर यशाची पुनरावृत्ती
2004 साली लातुर बोर्ङात महाराष्ट्रात प्रथम आलेले चंद्रकांत रणवीरकर हे आदित्यचे काका होते..

घरची परिस्थिती हालाखीची असताना आदित्यने प्रामाणिक मेहनत घेऊन हे गौरव यश मिळविले आहे आदित्य पंढरीनाथ रणवीरकर यांचे शिक्षण हे देगलूरच्या साधना हायस्कूल शाळेमध्ये पूर्ण झाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचे यशाबद्दल आभार व्यक्त केले आदित्य पंढरीनाथ रणवीरकर यांची घरची परिस्थिती हलकीची असून त्यांचे वडील हे गेले वीस वर्षापासून टीव्ही मेकानिकचं काम करत असून आई घरकाम व घरात असलेली पिठाचे गिरणीवर घरचा उदरनिर्वाह चालवत असून या यशाबद्दल त्या आई-वडिलांचा आंनद गगनात मावेना असं मान उंचावल्याबद्दल त्यांनी आदित्यचं तोंड भरून कौतुक केले आदित्य पंढरीनाथ रणवीरकर यांच्या विजयाच्या मागे त्यांनी त्यांच्या शाळेचे सगळे शिक्षकवृंद, मुख्याध्यापक तसेच क्लासेसचे करंडे सर, दिंडगीरे सर ,बिरादार सर, यांचे आदित्यला खूप मोलाचे मार्गदर्शन भेटल्यामुळे हे यश संपादन केलं असे आदित्य पंढरीनाथ रणवीरकर यांनी सांगितले या यशाबद्दल आदित्यचा सत्कार करण्यात आला यावेळी देगलूर शिवसेनेचे नेते धनाजी जोशी साहेब,चंद्रकांत रणविरकर सर,शिवा पाटिल गळेगावकर आदिनी पुष्पहार टाकुन आदित्यचा सत्कार केला. त्याच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleमान्‍सून पूर्वतयारीची आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रंगीत तालीम
Next articleनंदराज रुंजे यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९७.२० % घेऊन मिळवले घवघवीत यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here