Home गडचिरोली महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.श्री.अशोक नेते यांचे चामोर्शी येथे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन...

महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.श्री.अशोक नेते यांचे चामोर्शी येथे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करतांना आमदार डॉ. देवराव होळी….

130

आशाताई बच्छाव

IMG_20240403_211827.jpg

महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.श्री.अशोक नेते यांचे चामोर्शी येथे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करतांना आमदार डॉ. देवराव होळी….
गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
(चामोर्शी)
महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार श्री. अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवारी मिळाल्याचे व तिसऱ्यांदा विजयी हॅट्रिक व्हावे यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आनंद द्विगुणित करत आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील निवास स्थानी परिवारांसह शाल श्रीफळ देऊन खा.अशोक नेते यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

भेटी दरम्यान खा.नेते व आमदार डॉ. होळी साहेबांनी भाजपा संघटनेबद्दल विचार मंथन सुद्धा यावेळी करण्यात आले.

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहत आशीर्वाद रुपी विश्वासाने पूर्ण शक्तीने, पूर्ण ताकदीने निर्धार करून विजय संकल्प आपलाच राहील अशा भावना यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शुभेच्छा देतांना व्यक्त केल्या.
यावेळी सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,सामाजिक नेते नंदुजी काबरा,जिल्हा सचिव दिलीप चलाख,जेष्ठ नेते जैराम चलाख, युवा नेते निखिल धोडरे,रामचंद्र वरवाडे, उपस्थित होते.

Previous articleशेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ?
Next article_विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.._
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.