Home अमरावती E.P.S.95, पेंशन संघर्ष समितीची अमरावती येथे सभा संपन्न.

E.P.S.95, पेंशन संघर्ष समितीची अमरावती येथे सभा संपन्न.

182

आशाताई बच्छाव

IMG_20240322_170504.jpg

E.P.S.95, पेंशन संघर्ष समितीची अमरावती येथे सभा संपन्न.
————–
दैनिक युवा मराठा

पी. एन . देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती.
दिनांक २०मार्च २०२५रोजी दुपारी चार वाजता इंजिनियर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे ईपीएस पेन्शन संघर्ष समिती ची सभा आयोजित होती.या सभेसाठी या ठिकाणी श्री विरेंद्रजी राजावत राष्ट्रीय महासचिव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री डांगे, विधी सल्लागार, श्री टेंभरे, प्रांतीय सचिव, श्री अशोक थेटे, जिल्हा अध्यक्ष, आदी पदाधिकारी मंचस्थानी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री ठाकरे, माजी मुख्य कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी होते. वक्त्यांनी ईपीएस 95 पेन्शन बाबत आतापर्यंत केलेले कार्य आणि पुढे भविष्यात काय करावयाचे यासंबंधीचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना श्री
अनिलकुमार पेंढारी, सचिव राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अमरावती यांनी ईपीएस 95 पेन्शन धारकांना त्यांचे न्याय हक्क मिळावे यासाठी भविष्य निर्वाह निधी पेन्शन या पेन्शनधारकांमधून खासदार या पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहणे गरजेचे असून त्याशिवाय योग्य न्याय मिळणार नाही, तसेच ईपीएस पेन्शन ९५ योजने अंतर्गत मीनीमम पेन्शन ७५०० व महागाई भत्ता मिळावा यासाठी लढा यशस्वी करण्याकरता एम्प्लॉईज पेंशन स्कीम १९९५ च्या मिनिमम पेन्शन साठी कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी एकत्र येणे आणि एकाच वेळी एल्गार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. तरी आपली मिनिमम पेन्शनची मागणी संख्या अभावी सरकार विचारत घेत नसल्यामुळे हा प्रश्न सर्व ईपीएस 95 पेन्शन साठी कार्यरत असणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊनच हा लढा देणे आता गरजेचे झाले असे प्रतिपादन केले. याप्रसंगी माननीय श्री अशोकजी राऊत एम्प्लॉईज पेंशन स्कीम संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतत एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 अंतर्गत पेंशन मिळावी यासाठी सतत मोर्चे, आंदोलन, उपोषण, आमरण उपोषण, दिल्लीमधील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांचे कार्यालयाशी सतत संपर्क ठेवून एम्प्लॉईज पेंशन स्कीम 1995 अंतर्गत मिनिमम पेन्शन मिळण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तसेच त्यांनी श्रम मंत्रालय, वित्त मंत्रालय अधिकाऱ्यां कडे हा मुद्दा लावून धरत असल्याबद्दल त्यांचे कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे सचिव श्री अनिल कुमार पेंढारी यांनी गौरव पत्र देऊन त्यांचे कार्याचा गौरव केला व त्यांना द्यावयाचे गौरव पत्र श्रीविरेन्द्र राजावतजी यांना संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून हस्तांतरित करण्यात आले. सभास्थळी भविष्य निर्वाह निधी पेन्शन साठी लढा देत असलेले माजी जेष्ठ श्रेष्ठ सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी यांना आरएचपी फाउंडेशनतर्फे मदतीचा हात
Next articleवटपौर्णिमा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.