Home नाशिक नाशिक शहरात सात दिवसांपासून सिटीलिंक बससेवा ठप्प जनसामान्यांचे हाल!

नाशिक शहरात सात दिवसांपासून सिटीलिंक बससेवा ठप्प जनसामान्यांचे हाल!

181

आशाताई बच्छाव

IMG_20240321_093909.jpg

भगुर प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
नाशिक शहराचे हृदय मानले जाणारे सिटी लिंक बस सेवा ठप्प झाली असुन आजचा संपाचा ७ वा दिवस आहे
नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवा बंद झाली असून ठेकेदार तुपाशी अन् कर्मचारी उपाशी अशी परिस्थिती नाशिक सिटी लिंक परिस्थिती निर्माण झाली आहे
यावेळी ऐन परीक्षेच्या वेळी सिटी लिंक बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे बससेवा बंद असल्याने रिक्षा चालक ज्यादा पैसे आकारून प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे असे देखील चित्र पाहायला मिळाले
नाशिक रोड बस डेपो तुन काही प्रमाणात बस सेवा सुरु आहे पण अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन आणि पी एफ वेळेवर मिळालेला नाही
सिटी लिंक बस सेवेच्या संपाचा सातव्या दिवशी पालिकेने एक कोटीचा पी एफ भरला असुन ठेकेदार ‘मॅक्स सिक्युरिटीज’ या कंपनीला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस बजावली आहे महापालिकेच्या सिटी लिंक फाटक्या नियोजनामुळे दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संप झाला आहे त्यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना चाकरमानी यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे
सध्या नाशिक शहरात २५० बस धावता त्यातील ४० नाशिक रोड डेपो तुन तर २१० बस तपोवन डेपो तुन धावतात सध्या तपोवन डेपो तुन २१० बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे
आतापर्यंत झालेल्या नऊ संपाला मॅक्स डिटेक्टीव्ह या ठेकेदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची नोटीस बजावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.

Previous articleखोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदेलन करणार
Next articleआचारसंहिता संपणारच आहे;मग यांच्याशी खेटू – मनोज जरांगे पाटलांचा परळीतून सरकारला इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.